पार्वती अँग्रो सर्विसेस: महाराष्ट्र राज्यात अव्वल, ट्रॅक्टरच्या मदतीने शोती करणे सोपे शेतकरी कुटुंबाचा वारसा
दादांची स्वराज ट्रॅक्टर विक्री मध्ये गगनभरारी
श्री कैलाश गिरी यांनी 2010 मध्ये स्थापन केलेली, पार्वती अॅग्रो सर्व्हिसेस ही स्वराज ट्रॅक्टर्सची आघाडीची ट्रॅक्टर डीलर आहे.
बहुतांश स्वराज कंपनीचे इंजिनियर हे शेतकरी कुटुंबातून आहेत त्यामुळे शेतकऱयांनी शेतकऱ्यासाठी बनवलेल्या भारतीय स्वराज कंपनीचा वितरक डीलर असल्याचा कैलास गिरी (दादांना) अभिमान आहे. दादा नेहमीच शेतकर्यांची कोंटुंबिक तसेच त्यांची आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन त्यांच्याकडे उपलब्ध असलेले भागभांडवल लक्षात घेऊन त्यांना ट्रॅक्टर व्यवसायाबद्दल मार्गदशन करतात. म्हणूनच जिल्ह्यातील शेतकरी पार्वती ऐंग्रो सर्विसेसला हक्काचे मार्गदर्शन केंद्र म्हणून बघतात. ट्रॅक्टर हे एक जालन्यातील बहुतांश शेतकर्यांचे उत्पन्नाचे प्रमुख साधन आहे त्यामुळे मशागतीच्या व ऐन शेती कामाच्या वेळी दिलेली सेवा ही आति महत्त्वाची ठरते म्हणूनच आपच्याकडे विक्री करणाऱ्यान पेक्षा सेवा देणार्या स्टाफची (मेकॅनिकची) संख्या अधिक आहे.”
जालना: सन २००६ मध्ये मोसंबी सह उसाचे जवळपास ६० एकर क्षेत्र नष्ट झाले यानंतर कृषी विभागाकडून तयार करण्यात आलेल्या ज्ञेततळ्याने झालेली किमया आणि बाबांचा सल्ला कैलास (दादा) गिरी यांना यशस्वी शिखर गाठण्यात मोलाचा ठरला. ज्यामुळे ठिबक नंतर स्वराज ट्रॅक्टर विक्री मध्ये पार्वती अँग्रो सर्विसेस राज्यात सेवा देण्यामध्ये अव्वल ठरले.
वाकुळणि, दुधना काळेगाव, पानशेंद्रा आदी ठिकाणी वडिलोपार्जित असणाऱ्या शेती कसणाऱ्या दहावी शिकलेल्या कैलास गिरी दादा यांना २००६ मध्ये शेती व्यवसायात मोठ्या समस्येला सामोरे जावे लागले ज्यामुळे तब्बल ३० एकर मोसंबी आणि 3० एकर ऊस एवढे क्षेत्र पाण्याअभावी नष्ट झाले. आता काय करायचे हा प्रश्न समोर असताना त्यांनी कृषी विभाग गाठले तत्कालीन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सु.ल. जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली एक कोटी लिटरचे शेततळे तयार केले. शेततळ्याचे पाणी देण्यासाठी ठिबक गरजेचे होते. दुसऱ्याकडून विकत घेतल्या पेक्षा तू स्वतः एजन्सी घे हा वडील तुकाराम गुलाब गिरी अर्थात बाबा यांनी कैलास गिरी (दादा) यांना दिलेला महत्त्वपूर्ण सल्ला हा खऱ्या अर्थाने महत्त्वाचा ठरला. कैलास गिरी यांनी स्वतःच्या शेतात ठिबक बसवून त्याच कंपनीची एजन्सी घेतली. एजन्सीला जिल्ह्यामध्ये अतिशय चांगला प्रतिसाद त्यांना मिळाला.
सन २०१० मध्ये गिरी स्वराज ट्रॅक्टर चे वितरक झाले त्यांनी मोठ्या संख्येने लहान- मोठ्या ट्रॅक्टरची विक्री केली. स्वराज ट्रॅक्टर चे वितरक होण्यामागे तुकाराम गिरी (बाबांची) महत्त्वाची भूमिका होती ती म्हणजे भारतीय स्वदेशी बनावटीचे ट्रॅक्टर हे भारतीय शेतकऱयांसाठी विदेशी बनावटीच्या ट्रॅक्टरच्या तुलनेत दीर्घकाळ चांगली सेवा देतात हाच धागा पकडत दादा स्वराज ट्रॅक्टरचे वितरक झाले याचा कैलास गिरी (दादांना) अभिमान आहे. तीन भाऊ, वाकुळणीचे चार मामा यांची भरभक्कम साथ मिळाली त्यामुळे पार्वती अग्र सर्विसेस च्या माध्यमातून कैलास गिरी यांनी इतर ट्रॅक्टर विक्रेत्यांच्या तुलनेत जालना जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रमध्ये आपले नाव अव्वल करून ठेवले. याचे खरे श्रेय कैलास गिरी हे त्यांच्यावर विश्वास ठेवणाऱ्या ग्राहकांना देतात.
दादांनी पार्वती एंग्रो सर्विसेस मध्ये सर्व शेतकऱ्यांची मुले घेतली आहे, जे ट्रॅक्टर ग्राहकांना सर्विस देण्याचे काम करतात. पार्वती ऐंग्रो सर्विसेस मध्ये प्रत्यक्ष-अप्त्यक्ष काम करणाऱ्या शंभर लोकांचा समावेश आहे. ती शेतकऱ्यांची मुले आहे हे सत्य आज सर्वांच्या समोर आहे. आजही ग्राहक मोठ्या खात्रीने सांगतात की जी सर्विस या ठिकाणी मिळते त्यामध्ये आम्ही समाधानी आहोत. शेती व्यवसायात यांत्रिकीकरण हे अग्रभागी झाले असून यंत्राच्या माध्यमातून होती करत असताना वेळोवेळी अडचणी येतात. या सर्व अडचणी मूळे येणाऱ्या समस्या पार्वती अँग्रो सर्विसेस च्या माध्यमातून दूर केल्या जातात. त्यामुळे स्वदेशी बनावटीच्या स्वराज ट्रॅक्टरला शेतकऱ्यांची मोठी पसंती आहे.
राजूर रोड वरील शिवतारा अग्रो सर्विस येथे नव्या-जुन्या ट्रॅक्टर विक्रीचे मोठे दालन ट्रॅक्टरच्या विविध यंत्रसामग्री सह उभे करण्यात करण्यात आलेले आहे. तर नवीन मॉढा लगत हिंदनगर येथे ट्रॅक्टर दुरुस्ती साठी मोठे सर्विस सेंटर शेतकयांच्या सेवेसाठी सुरू आहे.
कैलास गिरी हे प्रगतिशील शेतकरी आहे. स्वराज कंपनीचा इतिहास बघितला तर तेथे काम करणार ट्रॅक्टर बनवणारे इंजिनिअरव कर्मचारी हे सर्व शेतकऱ्यांची मुले आहे. यामुळे कैलास गिरी यांनी आपल्या डीलररिपला सर्व शेतकऱ्यांची मुले घेतली. या मुलांना शेतकऱ्यांच्या समस्या सहज समजतात. त्यामुळे ट्रॅक्टर विक्री तसेच सर्विसिंग साठी मोठा फायदा झाला. यामुळे शेतकर्यांच्या सर्व समस्या सोडविण्यामध्ये मोठी मदत झाली. शेतीसाठी टॅक्टर असायलाच पाहिजे हे फक्त शेतकऱ्याचा मुलगा चांगले समजू शकतो.
शेतीला आधुनिक यांत्रिकीकरणाच्या जोडीमुळे बळकटी
वेळेत मशागत व्हावी शेतीला आधुनिक यांत्रिकीकरणाची जोड मिळावी यासाठी नवनवीन तंत्रज्ञान सातत्याने शेतकऱयांसाठी आणले जाईल. शिवतारा ऐंग्रो सव्हिसेसचे धाकटे बंधू नंदकिशोर गिरी हे खांद्याला खांदा देत संपूर्ण राज्यभर आधुनिक पद्धतीच्या शेती अवजारांचा पुरवठा करीत आहेत. ज्यामुळे पार्वती ऐंग्रो सविसेस ला मोठी बळकटी मिळाली. स्वराज ट्रॅक्टर समूह कडून वेळोवेळी हवे ते सहकार्य मिळते. ट्रॅक्टर तसेच अवजारे नव्हे तर विठ्ठल ऐंग्रो सव्हिसेस च्या माध्यमातून खते बियाणे शके यांचे दालन शेतकर्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे